वचन

Started by शिवाजी सांगळे, July 12, 2015, 11:46:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वचन?

नाही का आली ती?
झाले विचारते
कुजन मज वाऱ्याचे!

क्षण विरूनी गेले
आठवांचे भिजून
ओल्या चिंब सरींचे!

पाऊस पडून गेला
विसरलीस तु
वचन दिल्या भेटीचे!

असे कसे केलेस
नव्हतीस येणार,
आधीच ते सांगायचे?

© शिवाजी सांगळे
मो. +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९