$$ एक तेरा साथ $$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 14, 2015, 08:33:15 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$  एक तेरा साथ  $$$

बघ आपल्या प्रेमाचा वेळही
कसा जुळलाय आज
'एक तेरा साथ ' हाच आहे
माझ्यासाठी तुझा विश्वास आज

आजवर मी भरकटत होतो एकटाच
माझ्या एकटेपणाचा तूच केलास इलाज
नव्हत कोणतही व्यसन मजला
तू जीवनात येता झाला माझा नाइलाज

बघ तू आपल्या प्रेमाची सुरुवात हि
आता तुझच व्यसन जडलंय सकाळ सांज
तुझ्या आशा-आकांक्षा मीही ठेवीन जपून
माझ्या हृदयातील ठोक्यांची तूच ठरलीस गुंज

शेवटी एवढ तू नक्की लक्षात ठेव
तुझ्याच हवाली केलंय माझ सतरंगी काळीज
तूच ठरव आता काय करायचंय
मी ठरवलंय तुझ्यासाठीच समर्पित करायचं जीवन माझ .

                        विजय वाठोरे सरसमकर
                           ९९७५५९३३५९
                          दि १३ -०७ -२०१५