$$$$ अपेक्षा फक्त खऱ्या प्रेमाची ..$$$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 15, 2015, 08:58:10 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

माझी हि कविता माझ्या असीम चाहत्या शिवाजी पवार यांना अर्पण ..................................

$$$$ अपेक्षा फक्त खऱ्या प्रेमाची ..$$$$

तुझ्यापासुनी जरी दूर दूर मी
तरी चालत असतो तुझ्याच प्रेमाच्या प्रवासात
मन हंबरुनी गायी तूच तू
असतेस माझ्या मनातील मंदिरात

आज वर्ष उलटली आपल्या प्रेमास
अजुनी दरवळतो तुझाच प्रेमरंग माझ्यात
कुणी म्हणतो कुणास जानू
पण तूच झालीस जीवनसाथी माझ्या जीवनात

गर्द निळ्या आकाशी तूच एकटी चांदणी
तुझ्या सोबत मीही झालो चंद्रमा नभात
आता वय ही निघून जातंय चोरपावलांनी
तुझ्या प्रीतीच्या सहवासात राहाण आहे वाटत नशिबात

तूच सांग कसा आवर घालू या भावनांना
ज्या तुझ्याच प्रेमाच्या सावलीत सदैव असतात
हळुवार जपत असतो तूझ्य़ा आकांक्षा
अपेक्षा करतो फक्त तुझ्या खऱ्या प्रेमाची .......

                                    विजय वाठोरे सरसमकर
                                       9975593359

विजय वाठोरे सरसमकर