हरवलेलं मन

Started by vishal maske, July 15, 2015, 05:09:40 PM

Previous topic - Next topic

vishal maske

~!!! हरवलेलं मन !!!~

तीच्या एका नजरेनं
मन इतकं झूरवलं की,
ओसाडल्या रानावानी
मन मनातच हरवलं,

हरवलेल्या मना कुठवर
तीला नजरेपासून लपवायचं,
शेवटी तीला आपलं करुन
आयुष्यभर जपायचं,

तीला आपलंसं करण्यासाठी
मन हजारवेळा हरु दे,
तीच्या आठवणींच्या बाहुतच
मन मनमुराद झूरु दे,

ये हरवलेल्या मना
तीचे मन मला मिळू दे,
या मनाची आस आता
तीच्या मनालाही कळू दे....


विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
व्हाटस्अप : 9730573783

कविता आवडल्यास कवीच्या नावासहित पुढे पाठवुन सहकार्य करावे,...