चालताना वाट मी..

Started by rajeshreekamble, July 16, 2015, 04:03:39 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

चालताना वाट मी.. चढताना घाट मी..
अचानक थबकले, पहुनि ही लाट मी..
काय असाव रहस्य त्याचे पुसिते दिन रात मी..
चालताना वाट मी.. चढताना घाट मी..

पायांच्या झाल्या वाटा सार्‍या..
पण शोधते तुझी साथ मी..
चालताना वाट मी.. चढताना घाट मी..

मिठीची तुझया एक कळी
मागते पसरूनी हात मी..
चालताना वाट मी.. चढताना घाट मी..

श्‍वासाचे होती ओझे..
घेते विसव्याची रात मी..
चालताना वाट मी.. चढताना घाट मी..


--राजश्री