मन मात्रा वजा आहे..

Started by rajeshreekamble, July 16, 2015, 04:27:38 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

स्पर्शाच्या त्या शहार्याचा..
अनुभव अजुन ताजा आहे..
मी आहे इथेच कधीची..
मन मात्रा वजा आहे..

पूर्णविरामता त्या वाक्याची..
अजुन करते इजा आहे..
मी आहे इथेच कधीची..
मन मात्रा वजा आहे..

अस्तित्वाला झाली जखम..
प्रेमाची ही सजा आहे..
मी आहे इथेच कधीची..
मन मात्रा वजा आहे..




--राजश्री

Prem Mandale