राजकारणी गाय

Started by sanjay limbaji bansode, July 17, 2015, 09:36:21 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

कधी त्याचे कधी तिचे
तो धरत होता पाय
मंत्रीपदाच्या लालचीने
तो बनत होता गाय !!


मुजरा करून नाचन्याचा
चालू होता तमाशा
सत्तेचा  गूळ बघून
गुंगती याच्या माशा !!


खुर्चीसाठी कुणाचाही
तो बनत होता खास
जो चारा टाकेल त्याचा
तो बनत होता दास !!


विखुरलेला समाज याचा
बघत होता नव्या आशेने
सांगेल जिकडे,   त्याच
समाज,जात होता दिशेने !!

कवी - संजय बनसोडे
9819444028
(कृपया कवींच्या नावासोबत कवीता पुढे पाठवा )