तू काळजी नको करू

Started by sanjay limbaji bansode, July 17, 2015, 09:48:33 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

रात दिवस झुरु
पुन्हां पेरणी करू
साल महीने धरू
पण बा . . . . . .
तू काळजी नको करू !


जरी खोंळबला संसारं
समोर कर्जाचा डोंगरं
पाण्याविना सिवार बेजारं
पोटाले चिमटा देत झुरु
पण बा . . . . . . .
तू काळजी नको करू !


ना राहीलं काही गावी
शहरात सुरवात करू नवी
तिथही तुझी साथ हवी
गळ्यात फास घेऊन नको मरू 
अरे बा. . . . . . .
तू काळजी नको करू !


ना आलं काही हाती
तर विकून टाकू शेती
जाऊ दूर शोधू नवी नाती
काम शोधण्या गाव शहर फिरू
पण बा . . . . . . . .
तू काळजी नको करू !

संजय बनसोडे
9819444028