अरे पागल का लिहीतो कविता ? -२

Started by shrikrushna Gaikwad, July 17, 2015, 11:52:04 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

[1st read अरे पागल का लिहीतो कविता -1]

अरे सटकेल का लिहीतो कवीता ?
श्वासात उतरली म्हणुन लिहीतो
अश्रु बरोबर वहायली म्हणुन लिहीतो
ह्र्दयात धडकली म्हणुन लिहीतो
आणी तीच्या ह्रदयात...............
नाही धडकला ना तू

मग सांग मुर्ख मुला का लिहीतो कवीता ?
एकांतात तीच आठवली म्हणुन लिहीतो
मनात बसली म्हणुन लिहीतो
प्रेम करतो म्हणुन लिहीतो
आणी ती करते तुझ्यावर प्रेम.....................
नाही करत ना

म्हणुन विचारतो बाळा का लिहीतो कविता ?
तिला आवडते म्हणुन लिहीतो
ति वाचते म्हणुन लिहीतो
माझ दुख  समजते म्हणुन लिहीतो
तिच्या साठी आठवतात म्हणुन लिहीतो
शब्दातील भावना समजते म्हणुन लिहीतो
आणी त्या शब्दातील प्रेम.............
नाही समजत ना
खर खर सांग का लिहीतो कवीता ?

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com