नव्याने प्रेमात पडून.....

Started by pallavi wadaskar, July 17, 2015, 08:29:44 PM

Previous topic - Next topic

pallavi wadaskar

नव्याने प्रेमात पडून
नव्याने जगायला शिकले
जून स्पंदने हृदयाचे हरवून
एक नविन स्पंदने निर्माण झाले
हे मन कधी आकाशात उडू पाहते
तर कधी वाहत्या पाण्यात बुडु पाहते
हॄदयाचा नि मनाचा
झालाय सवांद सुरु
नसतोस जेव्हा तू
हे डोळे आसुसलेले असतात पाहायला तुला
असलास जवळ तू
हळूच पाहताक्षणी तुला
अलगद पापण्या लाजुन खाली झुकतात
हळूच गालांवरचा रंग गुलाबी होतो
नि ओठांवर तुझेच नाव येते


http://manatilchandane.blogspot.in/

pallavi Wadaskar