रोज पडत असतो मी... तिच्या प्रेमात नव्याने...

Started by NitinSK, July 18, 2015, 02:07:30 PM

Previous topic - Next topic

NitinSK

अशीच एक आवडलेली कविता ....
कवी - श्री. शिव S.K...

रोज पडत असतो मी... तिच्या प्रेमात नव्याने ...

तशी तर ती रोजचीच असते..
मीच हरवत जातो एखाद्या वेड्याप्रमाणे
असे का होते ??? का कोण जाणे ???
रोज पडत असतो मी... तिच्या प्रेमात नव्याने ...

ती न उर्वशी न ती मेनका....
ऐश्वर्या ही नाही...  न ती दीपीका....
ना ती इंद्राची परी ना ती कोणी अप्सरा बरं का..
पण तिची हर एक अदा मजला करते दीवाणे...
रोज पडत असतो मी... तिच्या प्रेमात नव्याने ...

तशी तिची माझी ओळख काहीच नाही...
न ती माझी कोणी... न मी तिचा कोणीही ....
बरं दोघांच्या वाटाही वेगवेगळ्या
तीचे दर्शनही दुर्लभ आणि तेसुद्धा अगदी आडवळणाने.....
पण तरीही .....
रोज पडत असतो मी... तिच्या प्रेमात नव्याने ...

आता तुम्ही म्हणाल हे तर एकतर्फी प्रेम आहे...
या वेड्याचा कधी न कधी होणार game आहे...
याच्या प्रेमाला न काही अर्थ, न याच्या प्रेमाचा काही नेम आहे......
याच्यासारखे तीचे किती असतील दीवाणे...
पण तुम्हाला तर माहीतच असेल .....
असते किती अवघड.......
या वेड्या..... मनाला समजावणे....
रोज पडत असतो मी... तिच्या प्रेमात नव्याने ...