वाऱ्या..

Started by विक्रांत, July 19, 2015, 01:31:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



किती केल्या वाऱ्या तरीही
मना वाट सापडत नाही
सालो साल पडते पाणी
आग तरीही विझत नाही

बैल थकले बैल मेले
गाडी ओढी नवी खिलारे
मनी दाटले भाव ठरले
ब्रह्मा भेटी जग चालले

ओहो रंगले शब्द दंगले
टाळ चिपळ्या नादामधले
काय खुमारी वर्णू देवा
वैकुठासी हातच टेकले

माझे मीपण सदैव झिंगले   
आणि वस्त्र फाटू लागले
आता लाज कशी बाळगू
सारेच बहाणे व्यर्थ गेले

चाल चालून आजा मेला
त्याला हिशोब नाही कळला
बापालाही तिच नशा अन
भोके सदैव सदऱ्याला

काय करावे कसे वेगळे
डोळे तिथेच खिळलेले
डोई भणभण पावुल चाले
प्रश्न अंगठा तुटलेले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/