* पैशावाल्यांच प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 20, 2015, 04:46:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* पैशावाल्यांच प्रेम *

आता रडुन काय उपयोग
डाव तिने साधला आहे
तुझ्या निष्पाप प्रेमाचा वेड्या
तिने बाजार मांडला आहे

शेवटी लोक खरच म्हणतात
आज मलाही पटले आहे
पैशावाल्यांसाठी प्रेम जणु
फक्त एक खेळणच आहे

मोठमोठी स्वप्न दाखवुन गरीबाला
भुलवन त्यांच नेहमीच आहे
मन भरल्यावर दुर लोटायच
हे आधीच ठरल आहे

प्रेमाची किंमत ठरते पैशात
भावनांचा व्यवहार शुन्य आहे
गरीबाच्या ह्रदयाचा लिलाव ही
तुकड्या तुकड्यांत मांडला आहे.
कवी-गणेश साळुंखे.