प्रेमचा हा नियम

Started by rajeshreekamble, July 20, 2015, 05:17:22 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

प्रेमचा हा नियम, मी मोडला नाही,
तो सोडून गेला हात, पण मी सोडला नाही,

अजुन ही वाट पाहतेय, धीर खचला नाही,
त्याच्या नसण्याचा घास, अजुन पचला नाही,

स्वप्नाच्या जगातून अजुन तो उठला नाही,
तो श्वास त्याच्यात अडकला, अजुन परतला नाही,

निघून तो गेला एकदा ही वळला नाही,
मी अजुन थांबलेय तिथेच, माझा जीव वळला नाही..

--राजश्री