मरण्याआधी इथे एकदा...!

Started by Rajesh khakre, July 23, 2015, 09:15:24 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

जगण्यासाठी जीवनाशी धडपड करत असतो
मरण्याआधी इथे एकदा जगून घ्यावे म्हणतो

कितिक मिळाले जीवाचे जिवलग ऋण मनी स्मरतो
जीवनात आंनद भरीला शीर तयांपुढे झुकवतो
भाग्यवान मी किती मजला मिळाली असले नाते
मरण्याआधी इथे एकदा जगून घ्यावे म्हणतो

जगण्याचा आंनद खरा ती संकटे मजला देती
कोण माझा अन परका जाणीव तयाची होती
संकटाना त्या माझे एकदा मित्र बनवू म्हणतो
मरण्याआधी इथे एकदा जगून घ्यावे म्हणतो

या जगाची रीत जरी ही असली काहीशी वेगळी
करु म्हणतो तीवरच प्रित जरी असे ती आगळी
श्वास तुटण्याआधी गाणे गाऊन घ्यावे म्हणतो
मरण्याआधी इथे एकदा जगून घ्यावे म्हणतो

किती मानावे आभार तुमचे ऊर हा भरुन येतो
पाणावती ही इवले डोळे अश्रु गळून जातो
एकदा तुमच्या पायावरती हे माथे टेकावे म्हणतो
मरण्याआधी इथे एकदा जगून घ्यावे म्हणतो
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com