कृष्ण ..

Started by विक्रांत, July 26, 2015, 02:39:41 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


एक काटा दुखरा
खोलवर रुतलेला
स्पर्श गूढ गहिरा
जाग निद्रेमधला

एक हळवी ओल
मनातील कातळा
अर्थ न कळलेला
मन पसाऱ्यातला

एक ओढ हिसका
रात्रंदिन लागलेला
प्रश्न आडवळणी
कधी न सुटलेला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/