आशीर्वाद

Started by anuswami, July 31, 2015, 08:46:04 AM

Previous topic - Next topic

anuswami

आशीर्वाद


उत्तुंग यशाचा ताग विणायला
संस्कारांची तुम्ही दिलीत सुई
नमन साष्टांग तुम्हास गुरुवर्य
तुमसे बढकर या जीवनी काहीच नाही



घरातून निघतो बाहेर जेव्हा
हातात आईच्या दहिभात असतो
तशीच ज्ञानाची भूक भागवायला
आमच्या पाठीवर तुमचाच मायेचा हात असतो



दिवस नाहीत ते राहिले आज
पण आज पुन्हा तुमच्या तासाला बसू वाटतंय
फळयावरच्या त्या सुंदर आकृत्या बघायला
आमच मन मनोमनीच दाटतंय



चूकीला माफीच प्रमाण लावून
शाबासकीची थाप तुम्हीच टाकता
भेदभाव कधी ना होतो कुणाशी
हृदयी तोच समभाव तुम्ही जपता



या कलियुगी आमच प्रस्थान होईल
होत जातील गुरु आमचे नगण्य
फिरून पुन्हा तुमच्याच चरणी लागू
केवळ तेव्हाच होऊ आम्ही धन्य



पडतो धडपडतो पण घडतो आम्ही
दिवस आहे आज खास
आज नाही मोहवीत ते सौंदर्य
नमतो तव चरणी आम्ही
पाठीशी असाच तुमचा आशीर्वाद राहू दया गुरुवर्य !!!

कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८