सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी

Started by शितल, August 06, 2015, 06:07:00 PM

Previous topic - Next topic

शितल

किती झेलले ते दुखः उन्हाळी
तरी डोळ्यांत या प्रतिमा ती ओली
ना माझे कुणी, ना मी कोणाची झाली
सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी   

दिशाहीन वाटे ही दुनिया सारी
या दुनियेची भाषा, ती रीतचं निराळी
ना माझे कुणी, ना मी कोणाची झाली
सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी

ती सुंदर स्वप्ने, ते प्रेमात जगणे
सोडून तो ही गेला, सारं एकेकाळी
ना माझे कुणी, ना मी कोणाची झाली
सोबतीला माझ्या या फक्त चार ओळी


शितल .......