मी आता पुन्हा हसणार नाही......

Started by प्रशांत दादाराव शिंदे, August 06, 2015, 08:54:10 PM

Previous topic - Next topic

तुला करावेच  लागेल दुर मला
तुला जगणे हे माझे ...तसे कधी कळणार नाही

दुर  गेल्याशिवाय आठवणे....तुला जमणार नाही
भेटलो जिथे तेथे .... मला तु  पुन्हा शोध घेऊ नको
तुला  प्रिये  हो  पुन्हा कधी  मिळणार  नाही...

येते  तुझी आठवण मलाही, रडतात हे डोळे माझे
माझे  हसु तुला कळणार नाही

मी  आता  पुन्हा हसणार नाही....

समजुन घे ..ऐकुन घे जरासे ...बोलु दे जरासे
भोग नशिबाचे आहेत हे माझ्या....ते तुला कधी
देणार मी नाही.......

जाईल मिटवुन  सारे .....

विझवु नको आसवांनी चितेला तु
माझ्या चितेतही मी तेव्हा....तुला मिळणार नाही
समजाव आसवांना तुझ्या
मी तुला पुन्हा मिळणार नाही

मी आता पुन्हा  हसणार नाही......

कोण  होतो  मी.... काय होती कहाणी
घे वाचुन तु आता मला जरासे.... साठवुन घे  जरासे
मी नजरांना  उद्या दिसणार नाही..

रडतेस  का तु असे ... याचेच मला  भय  तेव्हाही होते
मला  तु सोडणार  नाही.....

मी पुन्हा हसणार नाही....

रंग  ते  दिलेले  मी तुला .... ठेवील तसेच  जातानाही
आसवांत तुझ्या त्यांना कधी ....येऊ  देणार नाही.....

मी आता  पुन्हा  हसणार नाही......

©प्रशांत डी.शिंदे....
दि.०६.०८.२०१५..