प्रेमाची कहाणी

Started by sartaj, August 06, 2015, 10:54:09 PM

Previous topic - Next topic

sartaj

खुष होतो मी माझ्या दुनियेत,
दुखांना आमंत्रण देवुन कहाणी सुरू केली प्यारी,

ना ऐकले कोणाचे झालो आंधळा असा
आठवांनी तुझ्या केले माझ्या मनाला आजारी

वाटले मला फक्त मलाच मिळेल
पण विकले तिने प्रेम या प्रेमाच्या बाजारी

सोडुन सगळे सखे सोयरे बेभान झालो
केला गुन्हा,
पण् ती गेल्यावर तेच होते मनाच्या शेजारी

ना चुक तिची होती ना चुक माझी,
प्रेम करून कधी मिळते का वफादारी ??

हसलो मी आरश्यातल्या त्या दुखी चेहऱ्यावर,
विसरुणी प्रेम जेव्हा तिने दाखवली दुश्मनीची तैयारी

ठेवला विश्वास स्वताच्या श्वासांपेक्षा जास्त
निभावण्याच्या ऐन वेळी तिने केली गद्दारी

ना राहीले प्रेम "प्रेम" या शब्दावर
अशीच ठेच लावुन ती गेली जिव्हारी

नाहीत जात प्रेमाचे रस्ते हे स्वप्नापर्यंत
प्रेमाच्या या रस्त्यांवर वाढते आहे गुन्हेगारी