कालप्रवाह

Started by sachinikam, August 07, 2015, 12:34:52 PM

Previous topic - Next topic

sachinikam

कालप्रवाह

काळाचा प्रवाह धावतो संतत
ना ठाऊक उगम नाही अंत
नक्षत्रांच्या नक्षीने नटला आसमंत
तेव्हापासून आतापर्यंत प्रवाहे शाश्वत

देह ही नौका आत्मा नाविक
गाठाया पैलतीर अडथळे कित्येक
हरिनामाचा वल्हा वल्हव संतत
होईल प्रवास पुढचा सुखवंत

पहा जन विषये गुंतविती मन
विसरले अंतरीचे चैतन्य चिरंतन
मिरविती देह मिथ्य शोभिवंत
सत्य हे उघड आहे नाशवंत

ना थांबला कुणासाठी
ना धावला कुणापाठी
राजा असो वा रंक
एकच न्याय सर्वांसाठी

माझे कर्म माझे दैव
माझे संचित होई खंत
न डगमगला न ढळला प्रसंगी
तोचि साधुसंत तोचि साधुसंत.
-----------------------------------------
कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुखदर्पण
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com
https://www.facebook.com/Mukhdarpan/photos/pb.134789130036466.-2207520000.1438930200./134790130036366/?type=1&theater