जीवन पाखरांचे

Started by shailu_c, August 07, 2015, 07:35:50 PM

Previous topic - Next topic

shailu_c

सांज वेळी पाखरांना घरट्याची ओढ लागली,
अन् चोचितल्या दाण्यासाठी वणवण वाढली.

घरट्याशी जाता पिल्लांनी किलबिल केली,
पण डोळ्यातील अश्रूंनी दाणा नसल्याची खात्री दिली.

पिल्लांना कुशीत घेत मायेची उब दिली,
अन् विसर पडूनी दाण्याचा आईसह पिल्ले झोपी गेली.

arpita deshpande kulkarni

घरट्याशी जाता पिल्लांनी किलबिल केली,
पण डोळ्यातील अश्रूंनी दाणा नसल्याची खात्री दिली. heart touching