वेदना मनिची...!

Started by Rajesh khakre, August 08, 2015, 04:36:42 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

सुखापेक्षा वेदनेची
येथे बनते कविता
दुःखाचे चटके
स्रवविते मनाला

नाही कळत कुणाला
येथे वेदना मनीची
बाह्यदेखाव्याची
चर्चा चाले जनी ती

हास्य ओठावरी
दुःख उरी दाटलेले
अश्रु पापण्याआड
जणू काही दडलेले

कुणा ओरडून सांगू
जणू बधिरले कान
मनाची ती किंकाळी
ऐकेल कशी कोण?
---राजेश खाकरे
Mo.7875438494




Archana...!


Rajesh khakre

धन्यवाद अर्चना जी