मलाही वाटत...♥♥एकदा तरी प्रेम कराव♥♥

Started by Kruti, August 08, 2015, 11:40:46 PM

Previous topic - Next topic

Kruti

मलाही वाटत
एक तरी आपल म्हणार असाव....
मलाही वाटत
एक मित्रा सारखा जोडीदार मीलाव....
मलाही वाटत
आपणही एक सुंदर संसार रचाव....
मलाही वाटत
कोणीतरी मलाही आय लव युँ म्हणाव....
मलाही वाटत
हक्काने कोणीतरी मला ओरडाव....
मलाही वाटत
मी माझी काळजी नाही घेत म्हणूण माझ्यावरच चिडाव....
मलाही वाटत
आपण ही कोणाच तरी व्हाव....
मलाही वाटत
कोणी आपल्यासाठी पण रडाव....
मलाही वाटत
कोणीतरी मलाही सुखाचा घास भरवाव....
मलाही वाटत
एकदा तरी प्रेम कराव.... :-*

KRUTI....