**** प्रेमायण ****

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 09, 2015, 05:45:08 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

**** प्रेमायण ****

मी आलो ही होतो तुज्यापाशी
पण बघताच तुला बोलायचं विसरलं
तुझ्या निरागसतेला पाहून 
माझ हृदयहि जाग्यावरून गायब झाल !

तुझ ते लाजण जणू लाजाळूच पान
ज्यामुळे तू करतेस मला बेभान
प्रीती हि तुजवरी अशी जडली
जणू तू शरीर मी झालो प्राण !

तू अस प्रेम दिल कठीण ते सांगण
तू नसतानाही एकट्याशीच बोलत राहाणं
तुझाच भेटींचा जमाखर्च आठवून
मनात दु:ख असूनही चेहऱ्यावर हसू आणन !

तू अशी फुलाविलीस आपली प्रेमवेल
जी झाली आता प्रेमीयुगुलांची गाणी
खरच धन्य जाहलो मी तुला मिळवून
त्यामुळे आज आपण झालो प्रेमायणची वाणी !

                                            विजय वाठोरे सरसमकर
                                             9975593359