मला नाही झुरायचे..!

Started by Rajesh khakre, August 09, 2015, 09:13:50 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

मला नाही झुरायचे
ना आठवणीत मरायचे
ना कधी मागे सरायचे
मला फक्त तु हवी आहेस

मला वाट नाही पहायची
ना तडजोड करायची
तयारी जगाशी लढण्याची
मला फक्त तु हवी आहेस

केवळ तुझ्या विरहात
ना लिहायच्या कविता
रहायचे तुझ्या सहवासात
मला फक्त तु हवी आहेस

तुझ्याविना आयुष्यात
दुसरे काही उरले नाही
जीवनामध्ये जगण्यासाठी
मला फक्त तु हवी आहेस
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com