डॉ .गिरीश भट (श्रद्धांजली)....

Started by विक्रांत, August 09, 2015, 11:37:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



मैत्रीच्या परिघातील दूरवरचा तारा
पुष्कळ दूरचा अन खूप जवळचा
नाकासमोर चालणारा साधेपणा
पापाला नाकारणारा सच्चेपणा
देवाला मानणारा भिरुपणा
त्याच्या बोलण्यातून
वागण्यातून प्रगट व्हायचा
स्वतच्याच कवितेत रमणारा
कवितेचा आधार घेणारा
काव्यप्रेमी रसिक
त्याच्यात सतत दिसायचा

खरतर कधी असे वाटायचे
या मुन्सिपाल्टीच्या जगात
हा माणूस एकदम अनफिट आहे
इतके सज्जन सरळ कुणी असते का कधी
अन म्हणूनच कदाचित
शेवटी व्ही आर एस घेतला त्यांनी
पण नंतर सगळं काही व्यवस्थित चालू असतांना
शांतपणे जगतांना तशीच अचानक
जीवनातून व्ही आर एस घेतील ते   
असे कधी वाटले नव्हते
खरतर नोकरीतून बाहेर पडल्यावर
खूप बोलायचं होते
गप्पा मारायच्या होत्या
कवितेबद्दल अन घराबद्दल
मुलगा त्याचे भवितव्य व परदेशागमनाबद्दल
पण वेळ भेटलाच नाही
अन काळ कधी हातातून निसटला
हे कळलेच नाही

स्वामी समर्थांना शरणागत
हरी हरात समर्पित
एक निरागस सुशील शांत माणूस
मैत्रीच्या दूरवरील क्षितीजातून
लख्खकन चमकून निखळला
अशी माणसे दुर्मिळ असतात
अन वाटले अरे या माणसाशी
अजून जवळीक व्हायला हवी होती
खरंच मैत्रीला जिवलग करायची
एक संधी निसटून गेली होती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/