कधी तरी तु येशील ना ग आई

Started by shrikrushna Gaikwad, August 11, 2015, 11:54:13 AM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

कधी तरी तु
येशील ना ग आई
अनाथ नाही मी
सर्वांना सांगशील ना ग आई

दुख मनीच तु
जानशील ना ग आई
जीवनी येउन माझ्या
प्रेमाची बरसात करशील ना ग आई

चुक माझी तु
माफ करशील ना ग आई
भुक लागली मला
घास अन्नाचा मला भरवशील ना ग आई

अश्रु डोळ्यातील तुला
दिसतील ना ग आई
उन लागतय मला
तुझ्या पदराच्या सावलीत धरशील ना ग आई

आयुष्यात येत नाही माझ्या
माझ्या स्वपनात तर येशील ना ग आई
कधी तरी तु येशील ना ग आई

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com