तू नाहीस म्हणून ......

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 11, 2015, 05:25:09 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

तू नाहीस म्हणून ......

तू नाहीस म्हणून ........
कुठतरी हरवत माझ मुक्त खिदळण
मग जावून बसतो मी एकांतात
आणि ऐकू येत पुन्हा पुन्हा तुझच बोलण

तू नाहीस म्हणून ..........
सुण-सुण भासत हे जीवन जगण
मनोमनी होत असतो अपेक्षांचा भंग
आणि तुझ्याच आठवणी करतात मला तंग

तू नाहीस म्हणून...........
होत असतो  मी स्वत: त तल्लीन
देत नसतो कुणासही हसरा प्रतिसाद
मग असते तुझ्याच भेटीची आतुरतेची साद

                       विजय वाठोरे(साहिल) सरसमकर
                           9975593359