स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर..

Started by Pravin Raghunath Kale, August 14, 2015, 09:23:02 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

68 वर्षानंतर...
----*----*----
68 वर्षात किती बदलल्या व्यथा
काय ठरवायचं तुम्ही आम्ही आता

पारतंत्र्याच दृष्ट चक्र झटकून टाकलं होतं
आज 68 वर्षानंतर त्याच महत्त्व कुठं दिसतं

सरकारी कचेरीत, गांधीच्या फोटोखाली
लाच घेताना,
रस्त्यावर एखाद्याला अडवून
खिसे भरताना,
स्वातंत्र्य कधीच जळलेलं असतं...

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
प्रतिज्ञेत म्हणताना छान वाटते
पण रात्री-मध्यरात्री दिवसाही
बांधवांचे जीव घेताना,
सत्ता वापरून गरीबांना चिरडून
त्यांचे आयुष्य उध्वस्त करताना,
स्वातंत्र्य कधीच जळालेलं असतं...

68 वर्षानंतर आज आमच्या
त्याच व्यथा पाहिल्यावर,
स्वातंत्र्य कुठे दिसतं ?
68 वर्षानंतर....
----*----*----
प्रविण रघुनाथ काळे
मो : 8308793007
www.facebook.com/kalepravinr
Pravinkalemy.blogspot.in