श्रावण...

Started by शिवाजी सांगळे, August 15, 2015, 10:30:05 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

।। श्रावण ।।

शब्द सरी या बरसल्या
मन असे चिंबचिंब झाले,
श्रावण महतीने साऱ्या
रोम रोम श्रावणमय झाले !

प्रथम, या श्रावण स्वगता
व्रत नागपंचमीचे हो आले,
जाणिवेनेच सण व्रतांच्या
मन मन उल्हासित झाले !

व्दीतीय, नारळी पौर्णिमा
रत्नाकरा श्रीफळ अर्पिले,
टिकविण्या नाते जन्माचे
रक्षाबंधना भाऊराय आले !

तृतीय, मंगळागौर सणाला
नव्यानवरींनी अंगण भरले,
झिम्मा फुगडया खेळांनी
यथेच्छ जागरण की रंगले !

चतुर्थ, गोकुळी अष्टमीला
सावळे श्रीकृष्ण जन्मले,
बाळगोपाळ मिळून एकत्र
दहिहंडीचा खेळ खेळले !

पंचम, अमावस्या पुन्हा
बैलपोळा नावाने म्हटले,
कष्टतात जे वर्षभर सारे
कृतज्ञतेने त्यांना पुजिले !

आनंदाचा ठेवा श्रावण 
माता, भगिनींना ओढीचा,
व्रतवैकल्य अनुभूतींचा
मास पावित्र्य उत्साहाचा !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९