तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद

Started by Mandar Bapat, August 16, 2015, 07:42:40 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

आला पुन्हा गाभाऱ्यात भिक मागाया ,
हात जोडून मोकळा तू पाप कराया
देऊन आमिष फुलाचे तू विकतो गंध
तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद ....

शिकला जरी तू ,तुझ्यामते मी का नाही ?
शक्ती जर मी तर तू मला देवळी का पाही
आहे तुझी  ज्ञानाची गाठ ,पण  श्रद्धेचे उसवले बंध
तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद ....

जाणतो का येते झाडाला मुळानंतर  खोड ?
विज्ञानाला असतेच नेहमी अध्यात्माची जोड
आता होऊ दे मनाचे तुझ्या बुद्धिशी द्वंद्व
तोपर्यंत तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद ....

                                                         .... मंदार बापट




Ravi Padekar