जिवन शेतकर्‍याचे

Started by Aniket pawar1, August 16, 2015, 10:12:22 PM

Previous topic - Next topic

Aniket pawar1

शेतकरी हो शेतकरी , आता झाला भिकारी
मिळवाया दोन वेळची भाकरी फिरतो घरो दारी

बिज पेरल हो त्यान पावसाच्या आशेमंदी
पावसान पाठ फिरवली शेतकरी गेला निराशेमंदी

शेतात कोरड , आणी डोळ्यात ओल
बिज करपुन गेल अस सावकार बोल

आता नाही र तुझ्यापाशी कोणती आस
जळालार तुझा सोण्याचार घास

पोटात नाही र तुझ्या पोरांच्या दाणा
आणी सावकार म्हणतो माझ देण आणा

शेतकरी हो आता झाला हतबल,
निराशेच्या वाटेवरी दिसे कर्जाचा डोंगर

पोराबाळांची व्यथा त्यास नाही बघवत
दाना पाणी शोधण्यास तो हिंडतो घर दार

सावकारही त्यास देतो हाकलुन
करजाचा आकडा सांगुन

उपाशी पोटीच झोपे शेतकरी
दुसर्‍यादिवशी न सहन होता जाये फासावरी

कोण हो त्यास आता तारी
त्याच्या घरच्यांस आता कोण वाली

सावकार्‍यानेही आता जमीन लुबाडली
शेतकर्‍याच्या घरावर आता माधुकरी मागायची वेळ आली