शिक्षण व संस्कार

Started by शिवाजी सांगळे, August 18, 2015, 11:25:51 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शिक्षण व संस्कार

अन्न, वस्त्र, व निवारा या जशा माणसाच्या मुलभुत गरजा आहेत तशीच माणसाची आणखी एक गरज आहे ती म्हणजे शिक्षण.

शिक्षणा व्यतिरीक्त बकी तीन गरजा पुर्ण करता करता सारे आयुष्य कमी पडते, परंतु शिक्षण एका ठराविक काळात पुर्ण झाल्या नंतर (तसं तर माणुस आयुष्यभर शिकतच असतो म्हणा) स्वतःसाठी, घरासाठी, समाजासाठी पर्यायाने देशासाठी त्याचा उपयोग होतो.

शिक्षणामुळे विचार, दृष्टी, जाणिवा व्यापक होतात असा सर्व साधारण समज आहे, शिक्षणाचा वापर मानवाने सर्वांच्या हिता साठी करायला हवा. जगात चांगल्या व वाईट प्रवृत्ती आहेत. परंतु आजच्या एकविसाव्या शतकात तुलनेने अशिक्षित कमी व सुशिक्षित जास्त सापडतील, जरी काही प्रमाणात अशिक्षित असलेच तरी ते खुप विध्वंसक नसावेत? ज्या प्रमाणात शिक्षित आहेत. उदा.२६/११/१९९३ ट्वीन टाँवर हल्ला,२६/११/२००८ मुंबई बाँम्ब स्फोटासह जगभरात झालेल्या व होत असलेल्या सा-या विध्वंसक कारवाया, असंतोषाच्या घटना पाहील्या तर असे लक्षात येते कि या सर्व कारवायां मागे एरोनाँटीकल, कंप्युटर इंजिनियर तर कुणी चार्टड अकांउटंट अशा डीग्र्या असलेल्या उच्चशिक्षित तरूणांचा मोठा सहभाग आहे.

अगोदर म्हटल्या प्रमाणे जर शिक्षणामुळे विचार, दृष्टी, जाणिवा व्यापक होत असतील तर अशा उच्चशिक्षित तरूणां कडून त्यांच्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या, समाजाच्या उपयोगी न पडता विध्वंसक कामां कडे कसा होतो? अर्थात या एवढया मोठ्या विचार परीवर्तनात धर्माचा प्रभाव लक्षात योण्या जोगा आहे. पण तस तर कोणताच धर्म हिंसा, विध्वंस करा असा संदेश देत नाही. हे सुध्दा नाकारता येणार नाही.

धर्मा पाठोपाठ येतात ते संस्कार, आपण आपल्या मुलांवर कसे संस्कार करता त्या नुसार त्यांची वागणुक होते, समाजकडे बघण्याची त्यांची नजर तयार होते. चांगले संस्कार शेवट पर्यंत राहतात, व.पु.च्या "एकबोटे भुत" या कथेतील भुताच्या तोंडी असं वाक्य आहे कि "जीवंतपणी झालेले संस्कार मेल्यावर सुध्दा तसेच राहतात"

समाजाला, देशाला घडविण्यात तरूणांचा सहभाग फार महत्वाचा व मोठा आहे, चांगला समाज घडविण्याची ताकद त्यांच्यात आहे, हि ताकद अन्य कुठे वाया न घालवता, कोणत्याही जुनाट, कालबाहय रूढी परंपराना पोषक न होता जगाच्या चालीरीती नुसार समाजच्या उपयोगात यायला हवी, यातच त्यांच्या बुध्दीचा वापर व्हायला हवा.

शिक्षण तुम्हाला लिहा वाचायला शिकवतं, चांगल्या वाईटाची जाणं देतं, स्वतःची बुध्दी वापरून भल्या साठी झोकुन देता आले पाहिजे. मुठभर चिथावणीखोरांच्या नादी लागुन कुणाचेही भले झालेले नाही, उलट जीवच गमावले गेले आहेत याला इतिहास साक्ष आहे. धर्माच्या नावाने भडकावुन ठराविक लोक राजकारण करतात, त्यात अडाणी तर भरडतोच पण सुशिक्षित पार होरपळुन जातो, स्वतः तर जातोच पण त्यांच्या कृत्यांचा त्रास मागे राहिलेल्या कुटुंबाला पण होतो.

आई वडीलांनी, कुटुंबाने त्यांच्यासाठी उपसलेले कष्ट, पैसा वाया घालविण्याचा, जुळलेले ॠणानुबंध तोडण्याचा आणि कुटुंबियांना आयुष्यभर समाजात मान खाली घालावी लागणारी कृत्य करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? शिक्षणावर, प्रप्त केलेल्या ज्ञानावर कुणालाही वरचढ नाही  होवु देता आले पाहीजे, मन वळविणा-या, भुलवणा-या वगैरे गोष्टी ज्ञानाच्या कसोटीवर पारखुन घेता यायला हव्यात. काय उपयोग अशा शिक्षणाचा? जे असुन सुध्दा धार्मिकतेला बळी पडून हिंसा करवते! कुणीही व्यक्ती जी आपल्या कुटुंबावर, घरावर, देशावर प्रेम करते ती असं करणार नाही. अशी आशा ठेवायला हरकत नसावी. (३०/७/२०१५ ते १८/८/२०१५)
=शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे+919422779941+919545976589 email:sangle.su@gmail.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९