गझल

Started by श्री. प्रकाश साळवी, August 20, 2015, 12:23:56 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

मिळता होकार तुझा मी उमजून गेलो
पाण्याविना मी पुरता भिजून गेलो
वसंतात सारे जग बहरून येते
ग्रीष्मात इथे मी पुन्हा बहरून गेलो
वाटले कधी जावे तुझ्या स्वप्नात मी
जागेपणीच मी स्वप्ने सजवून गेलो
वाटले कवतिक तुझ्या साहसाचे
गराड्यात माणसांना मी फसउन गेलो
डोक्यात पेटला वणवा विचारांचा
ज्वाला विचारांच्या मी विझवून गेलो
ग्रासलोच होतो पुरता निराश भावनेने
निराशेलाच माझ्या मी रिझवून गेलो
विसरणार नाही कधी भेट चांदण्यांची
चांदण्यात पुनवेच्या " हा चंद्र " होऊन गेलो.

प्रकाश साळवी