तृषार्त चातक

Started by sachinikam, August 20, 2015, 05:30:43 PM

Previous topic - Next topic

sachinikam

तृषार्त चातक

चिरडली भूई आकाश फाटले
उन्हाच्या झळयांनी शिवार पेटले

शुष्क कंठात प्राण दाटले
शोकसागरातील अश्रू आटले

वावटळ गेली उडवून धूळ
अवकळा आली कुठून पांगूळ

नभी नजर चातकाची लागली समाधी
तृषापुर्ती पुरते मिळेल का पाणी ?

करड्या रंगांचा थवा उडाला उडाला
कोरड्या चोचीत नाही थेंबही पडला

बरसुदे आता सर बरसुदे सर
भारावला भाता विनवितो आर्त स्वर

करी कृपा देवा बरसुदे जल जल
अमृताहूनही गोड लागी उदकाचे बोल.

कवितासंग्रह : मुखदर्पण
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com