= नागपंचमी =

Started by SHASHIKANT SHANDILE, August 21, 2015, 02:31:03 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

तुम्ही नका न मारू त्याला जर देव मानता
घाबरताच इतकं तर काय देव जाणता
एक दिवस लई करून आवभगत त्याची
वर्षभर त्याला संपवण्याचंच काम करता

अरे तोही एक प्राणी माणसाप्रमाणे पृथ्वीचा
त्यालाही अधिकार खुशाल जगण्याचा
विष काढून त्याला निशस्त्र तुम्ही केला
त्याला नाही का अधिकार स्वः रक्षणाचा

माणूस म्हणून वानविता स्वतःला तुम्ही
तुमच्या पेक्षा तो जनावरच दिसतो गुणी
आंधळ्या डोळ्यांनी पाहत आल्या रूढी
का मानावी तुमचीच आगाऊ न्याय नीती

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी :- ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!