श्रावणात दंगला श्रावण

Started by sachinikam, August 24, 2015, 09:50:08 AM

Previous topic - Next topic

sachinikam

श्रावणात दंगला श्रावण

हिरव्या धरणीवर लावण्य सोहळा
नेसल्या लतिका सुमनांच्या माळा

उत्तुंग नभाचा घुमट निळा
लावुनि माथ्यावर तेजस्वी टिळा

अथांग सागराचा रुबाब वेगळा
डौलात किनारी लोटांगण खळखळा

उधान वाऱ्याचा बेतच निराळा
विखुरला भवताली प्रीतगंध जिव्हाळा

फुटले पंख मेघांना
वाकड्या तिकड्या रेघांना
मिळाला एकांत दोघांना
उनासावलीच्या रंगांना

पाठशिवणीचा खेळ रंगला
श्रावणात श्रावणही दंगला

कवितासंग्रह : मुकुटपीस
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com


https://www.facebook.com/MukutPees/photos/pb.524097061055994.-2207520000.1440158425./524098554389178/?type=1&theater

sachinikam

श्रावणात दंगला श्रावण

sachinikam

पाठशिवणीचा खेळ रंगला
श्रावणात श्रावणही दंगला