mazi kavita- anushree

Started by anushree, January 25, 2009, 07:34:18 PM

Previous topic - Next topic

anushree

some of my other poems are on this community...welcome to join :D

Admin Note:
with her permission her kavita is updated in proper segment by adding her name below it.
thanks.

marathi


anushree

सूर्य अजून बुडालेला नाही..
ढगांच्या मागे थोड़ी प्रकाशाची तिरीप आहे.
पल्याड दिवस झालेला नाही..
अल्याड दिवेलागणी, इथे रात्र समीप आहे.

वारा घोंगावतो माझ्या ग्लासात..
मला त्याचीच थोड़ी पिसाट झिंग चढ़ते.
तसच कुणीतरी घोंगावत मनात..
आठवणीची दाटी, आभाळही कातर भासते.

घरात दिवा लावलेला नाही..
काही काळ सावल्यांशी मला खेळत राहायचय.
चंद्र अजून उगवलेला नाही..
वरच्या कुणालातरीही असच काहीतरी करायचय.

कुठलतरी काम आठवत अखेर..
आणि मी उठते, आत जाऊन दिवा लावते.
ढगही पांगतात, चंद्र दिसतो..
आणि ती हळवी, कातर सांजवेळ, तेव्हा सरते.

पळत राहायच..
एकेक काम करत..
वाहात राहायच..
काळा बरोबर..
ढगां बरोबर..
वार्‍या बरोबर..
पळत राहायच !
कामाच्याच मागे..
दिवस सरतात !
सांजवेळाही...
आणि रात्री... ?
जाऊ दे !
डोळे मिटले वा नाही
सकाळ तर होतेच ना....

anushree vartak

anushree

काय मागू?

करायला विचार
जगायला आधार
बघायला आभाळ
निजायला घरदार मागू?
काय मागू?

लिहायला शब्द
सोसायला अर्थ
भिडायला भावना
जुळायला यमक मागू?
काय मागू?

प्यायला प्याला
कंपनीला मित्र
चढायला झिंग
विसरायला 'ती' मागू?
काय मागू?

पडायला प्रेम
धरायला हात
रमायला बायको
वाढवायला पोरं मागू?
काय मागू?

जपायला संस्कृती
जाळायला पोस्टर
चघळायला वाद
टाकायला मत मागू?
काय मागू?

जाऊ दे
आज रोख
उद्या उधार मागू !
anushree vartak

anushree

तू अफाट..
मी अफाट..
आपली भेट ही..
व्हावी अफाट.......

तुझ्या शब्दांचे..
दिवे पेटव..
काळोखाच्या..
किनार्‍यावर,
चांदण्याला..
सापडू दे लय..
आवेगाच्या..
लाटा सावर,
तार्‍याना गुंफून..
नक्षत्रे दाखव..
चंद्रावर ओढ़..
ढगांची चादर,
थोडा गडद..
एकांत रंगव..
फ़क्त तू मी..
बाकी धूसर.........

तू अफाट..
मी अफाट..
आपली भेट ही..
व्हावी अफाट.......
anushree vartak

anushree

तरूणाई
काळोख्या रात्री एका, जेव्हां अंधार बोचू लागला
उजाड़ झालेल्या मातीचा, हुंकार येऊ लागला

उसळणार्‍या लाटा, पाषाण भिंतीवर थडकू लागल्या
बलिदानाच्या ज्वाळा, आकाशाला भिडू लागल्या

आक्रोश, फुटक्या काचा, पोरकी आयुष्ये साचू लागली
रिकामी कूस, आता तिला भरीस जाचू लागली

त्या रात्री, रक्ताळलेल्या डोळयांनी जगाने पाहिलेलं
हे तरूणाईचं स्वप्नं, आशेच्या पहाटे उमललेलं

MK ADMIN

nice.....keep the good work going..

tuhze Words chaan ahet..... it has a impact.

MK ADMIN

great....Awarded you 1 Popular Point.


Ram.potale

[b :) :)uup chhann ahet kavita....