शुभ दीपावली---तुझा होकार विसरेना!! तुझा होकार विसरेना!!---अमित जयवंत गायकर

Started by AMIT GAIKAR, September 01, 2015, 12:25:22 PM

Previous topic - Next topic

AMIT GAIKAR

दीपावली च्या सर्वांना हार्दिक शुभेच्या. खालील कविता माझी पहिली पोस्ट होती www.marathikavita.co.in वर. थोडे बदल करून दीपावली च्या शुभ दिवसावर   परत पोस्ट करीत आहे....... शुभ दीपावली

विसरू तुला रोज मी करितो प्रयत्न निष्फळ,
हृदयात आहे तीच एक कळ,
विचार हाच दिवस आणि रैना,
तुझा होकार विसरेना!!
तुझा होकार विसरेना!!

उद्या होणार तू नशीब दुसर्याचा,
विचार करुनी होतो मन कासावीस,
आठवितो तुझ्या गहू वर्णीय चक्षून ची नशा,
तुझा होकार विसरेना!!
तुझा होकार विसरेना!!

केश ऐसे काळी भोर रात्र जसे,
होठ ऐसे गुलाबाची पात जसे,
साक्षात मोहिनी अवतार तू ,
हे बघुनी देव लोका ही आवरेना,
तुझा होकार विसरेना!!
तुझा होकार विसरेना!!

तुझी स्वचंध काय बघुनी,
सोडिली चान्दिनी शशी नि,
दिनकर ने हि त्यागीला प्रकाश त्याचा,
बघुनी तेज तुझ्या चेहर्या वरचा,
काळी जादू आहे त्या तिळाची,
होठा खाली वस्ती ज्याची,
तुला बघता चकित आहेत देव्लोकांची अप्सरा,
तू काही त्यांना हि समजेना,
तुझा होकार विसरेना!!
तुझा होकार विसरेना!!

                             -- अमित जयवंत गायकर