काय असत प्रेम ?

Started by Shri_Mech, September 02, 2015, 04:24:11 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

काय असत प्रेम ?
जे वाईट कामापासून परावृत्त करत ते कि
जे वाईट काम करायला लावत ते,

काय असत प्रेम ?
जे मरणापासून खेचून आणत ते कि
जे जगण असह्य करून टाकत ते,

काय असत प्रेम ?
जीवन आनंदाने भरून टाकत ते कि
जे जीवनमार्गात काटे पेरत जात ते,

काय असत प्रेम ?
कायमच एका हव्याहव्याशा बंधनात बांधत ते कि
इतर सर्व नात्यांची बंधन सैल करायला लावत ते,

खरच, काय असत प्रेम ?
Shri_Mech