==* कसे जगावे *==

Started by SHASHIKANT SHANDILE, September 02, 2015, 04:31:14 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

विसरभोळे मन हे
तुला विसरत नाही
स्वप्नात तू न येता
गप्प निजत नाही

         हरवली तू दूर कुठे
         शोध घेता सगळीकडे
         विरह प्रेमाचा जीवं घेणे
         येशील ना गं परत सखे

विसरुनी तुला जगने
मला जगवत नाही
रडवूनी तुला हसणे
मला हसवतही नाही

        दुराव्याचे दिवस रात्र
        काटंल्या कटेना
        हास्य ओठांवर आता
        फुलंता फुलेना

ये परतुनी प्रिये एकदा
उणीवं तुझी भासते
वाट बघता बघता एकांती
भीती जगण्याची वाटते

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी :- ९९७५९९५४५०
दि. ०२-०९-२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!