* आज *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 02, 2015, 05:49:29 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* आज *
कळतंय सार आज मला
खोट्या प्रेमात फसवलं मला
जाणिव होतेय आता सत्याची
उगाच तुझ्यावर विश्वास केला

मी नव्हतोच कधी महत्वाचा
शेवटी पैसाच मोलाचा ठरला
प्रेमाच्या जगात माझ्या भावनेचा
लिलाव तु कवडीमोल केला

स्वार्थ साधणे जमले नाही
तिलांजली दिली प्रत्येक स्वप्नाला
एकदाच काय स्वतासाठी जगलो
तेही बघवले नाहीना तुला

काही हरकत नाही ग
जगत होतो आधीही तुझ्याविना
आता मरुणही जाईल तुझ्याविना
एवढच सांगुन जातोय आज तुला. :(
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938