तुझ्याशिवाय माझा दिवस पुर्ण होतच नाही

Started by sammadival, September 03, 2015, 11:37:30 AM

Previous topic - Next topic

sammadival

आजकाल सारखीच तुझी आठवण येते
वेळ मिळताच तुझे बोलणे आठवते
का ते कळत नाही पण
दिवभर तुझ्याशी बोलवेसे वाटते
बोलल्यावर तुझ्याशी मला फार छान वाटते
आठवण तुझी आल्यावर काही केल्या जात नाही                         
तेव्हा मात्र बोलल्यावाचून तुझ्याशी राहवतच नाही
असा क्षण माझ्या आयुष्यात
अगोदर कधी आलाच नाही
आज अगदी खर सांगते
तुझ्याशिवाय माझा दिवस पुर्ण होतच नाही

वीणा
9762282827

विजया

टीप -

माझ्या अंगातल्या हॉर्मोन्सचा तो प्रभाव आहे.

तुझ्याशी (किंवा समजा दुस‍‍‌र्‍या कोणाशी)
शुभमंगल माझे झाल्यानंतर
(आणि एक मूल झाल्यानंतर)
आजच्या माझ्या स्वप्नसृष्टीतून 
सत्यसृष्टीत अवतरेन मी