जमलं तर.......

Started by sammadival, September 03, 2015, 09:34:26 PM

Previous topic - Next topic

sammadival

जमलं तर करून बघ.
रागामध्ये असतानाही एखाद्याशी प्रेमाने बोलून बघ...राग नाही गेला तर सांग...पण करून तर बघ.

स्वतःला शोधतोयस....पण लोक बोलतायत तू कसा आहेस त्यामध्ये....1दा स्वतःच्या मनात शोधुन बघ...स्वतःशी ओळख नाही झाली तर सांग...पण करून तर बघ.
                             
सुखाच्या मागे धावतोयस...थोडसं   समोरच्याला सुख देऊन बघ...मग तुला नाही मिळालं तर सांग...पण करून तर बघ.
     
रस्त्यावरील झाड देखील सगळ्यांना सावली देतय... तू पण त्या झाडासारख वागुन बघ...आनंद नाही मिळाला तर सांग...पण करून तर बघ

रक्ताची नाती जपतोयस...1दा फक्त आपुलकिच नात जोडून बघ...आयुष्यभर टिकल नाही तर सांग...पण करून तर बघ.

आयुष्य यंत्राप्रमाणे जगतोयस...1दा निवांत जगून बघ...जगल्यासरख नाही वाटलं तर सांग...पण करून तर बघ.

वीणा
9762282827