श्रावण

Started by smadye, September 04, 2015, 06:11:44 PM

Previous topic - Next topic

smadye

    श्रावण

आज गोकुळात न खेळू शके हरी
पाणी नाही पाणी नाही कोणाच्या घरी

आले सवंगडी पण कोणी खेळेना
पाण्याशिवाय खेळ काही रंगेना

ये ग सरी ये ग सरी माझे मडके भरी
आला श्रावण पण न पडल्या सरी

श्रावणात हिरवळ काही दिसेना
कोरडी झाली तळी पाणी साठेना

असा कसा आला श्रावण पाऊस आहे दुरी
पाण्यावाचुनी इंद्रधनुष्य न दिसे अंबरी

येरे पावसा तुझी मी विनवणी करी
येवूनी तू आमुचे मडके भरी

    सौ सुप्रिया समीर मडये