भांडण... तिचे आणि त्याचे

Started by जयंत पांचाळ, September 04, 2015, 11:26:06 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

ठिणगी एकच काल
उडाली होती मोठी,
विशेष नव्हते कारण
ति बोलत होती खोटी...

त्याचे एकच काम
बसून तरीही उन्नत,
एकोप्या साठी तिने
घेतली सर्व मेहनत...

तिची होती एक
मनीच ती धुसपुस,
काय करील ती त्यास
तिचीच रिकामी कुस...

याच साठी चालली
होती तिची धडपड,
त्याला वाटले खोटे
हि त्याचीच झापड...

तिने त्याच्यासाठी आज
उपवास होता धरला,
त्याने मात्र आज
ग्लास पुन्हा भरला...!

- जयंत पांचाळ (०३/०९/२०१५)
९८७००२४३२७


Ravi Padekar