मौन तिचे

Started by Shri_Mech, September 05, 2015, 01:53:43 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

मौन तिचे

भरभरुन दिला विरह देवाने,
दसऱया अगोदर झेंडू फुलल्याप्रमाणे,
मोजकाच मिळाला तिचा सहवास,
देवासमोर ठेवलेल्या साखरेप्रमाणे....

रचून पाहिल्या प्रयत्नांच्या चाली,
लढवून पाहिल्या सर्व शक्कली,
निराशाच दरवेळी पदरी आली,
जणू होती पाचवीलाच पुजलेली....

वेळच मागितला होता घटकाभरासाठी,
नकारच मिळत गेला मला नेहमीसाठी,
कधीच ना कळले मौन तिने पाळलेले,
माझे मन जणू दुष्काळात करपलेले....

परिक्षाच घेतली परमेश्वराने
महाभारतातल्या स्वयंवरासारखी,
नव्हती पाहिजे मला द्रौपदी,
हवी होती तिच्याकडून थोडीशी प्रीती....

Shri_Mech
Shri_Mech

ज्योती

नकारच मिळत गेला मला नेहमीसाठी...


नव्ह्ते वाटले स्वारस्य तिला उघडपणे
काही ना कारणासाठी,
असेल वाटले स्वारस्य तिला
दुसर्‍या कुणा मदनाच्या पुतळ्यामधे;
त्या मदनाच्या पुतळ्याला
तिच्यात स्वारस्य वाटेल न वाटेल,
वाटेल स्वारस्य त्याला दुसर्‍या कोणा योषितेत;
त्या योषितेला वाटेल कदाचित्‌
स्वारस्य दुसर्‍याच कोणा नरशार्दूलामधे...
 

अश्या गोष्टी नित्य घडतच असतात
परीक्षाबिरीक्षा नव्हती घेतली परमेश्वराने
येई्लच दुसरी कोणी परस्परानुरूप सीमन्तिनी
तुमच्या आयुष्यात यथावकाश.









Shri_Mech

मनापासून धन्यवाद....
आपलं शब्द भांडार खरच विलक्षण आहे. आपण पूर्ण केलेली कविता पण अप्रतिम आहे.
Shri_Mech

ज्योती

Shri_Mech,

मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात परस्परानुरूप सहचरी यथावकाश हमखास येईल.

तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा.