अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती

Started by tanu, December 11, 2009, 11:39:47 PM

Previous topic - Next topic

tanu

गीतकार    :मंगेश पाडगांवकर
गायक    :सुधीर फडके
संगीतकार    :यशवंत देव

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजूनी जाय उजळूनी, काळोखाच्या राती

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समयीमधूनी, अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती