झालीया वानवा. काळ्या मा

Started by Sachin01 More, September 05, 2015, 09:22:14 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More


हिरव्या शेताची आता,
गावा झालीया वानवा.
काळ्या माईलाही आठवल्या,
अतोनात खोलवर भावना.
झळया दिसू लागल्या
धुर्यावरच्या झाडाखाली
सकाळीच न्याहारी झाली,
थोड्याशाच पाण्यापायी
जनावरांची मका वाळू लागली,
त्याच्या नावाच्या मदतीने,
शहरात घरे भरू लागली,
बांध्यावरच पाणी आता
कारखान्यात पळू लागलं
रोजगारापायी हो
अर्धे गाव उपाशी राहू लागलं,
गावा-गावात बसल्या
विनाकारणी बैठकी
सत्ताधार्याच्या कानांमधी ओतल्या,
काळजाच्या त्या कैफीयती
झाले लिहून अहवाल
गेला वरसाचा काळ
नाही दमडी हातात,
सूटा-बूटात साहेब येतो दिसा-माळ
गालाच्या खळीता हसून
विचारतो आता काय पेराल???
Moregs